Video: भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

0

मुंबई:- मंत्रालयासमोर बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी नगर येथील एका तरूणाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गणेश पवार असे या तरुणाचे नाव असून तो रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. दुपारी १ वाजताच्या सुमारास ही मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणांला पोलिसांनी अटक केली आहे.

भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी आरोप असलेल्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना अजूनही अटक होत नाही. भिडे यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील राहूरी येथील गणेश पवार यांनी दूपारच्या सुमारास स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्य प्रवेशद्वारासमोर पास काढण्यासाठी गर्दी झालेली असल्याने खळबळ उडाली.

यावेळी गणेश पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश पवार हा रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गणेश पवार याला पोलिसांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी केली जात आहे. भिडे यांना अटक करावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलने केली जात आहेत. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे यांना क्लिनचिट दिली आहे.