मंत्रिमंडळाची यादी जाहीर, खान्देशातून गुलाबराव पाटील, के.सी. पाडवी यांचा समावेश

0

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार होत आहे. या मंत्रीमंडळात २५ कॅबिनेट, १० राज्यमंत्री आज शपथ घेणार आहे. उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार हे शपथ घेणार आहे. महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात अनुभवी मंत्र्यांसह आणि तरुण मंत्र्यांचाही समावेश असणार आहे.

हे घेणार मंत्रीपदाची शपथ शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, अनिल परब, शंभुराजे देसाई, उदय सामंत, संदीपान घुमरे,शंकरराव गडाख. राज्यमंत्री अब्दुल सत्तार, बच्चू कडू. तर राष्ट्रवादी पक्षाकडून अजित पवार, नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे, संजय बनसोडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, जय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनिल केदार, यशोमती ठाकूर,वर्षा गायकवाड, अस्लम शेख, काँग्रेसचे हे मंत्री घेणार शपथ अशोक चव्हाण, के सी पडवी, विजय वडेट्टीवार, सतेज(बंटी) पाटील, विश्वजीत कदम