मंत्रिमंडळ विस्तार; पहिला शपथविधी राधाकृष्ण विखे पाटलांचा

0

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु झाला असून पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना दुसरा मान देण्यात आला. तिसरी शपथ आशिष शेलार यांना देण्यात आला. अनिल बोंडे, सुरेश खाडे, संजय कुटे, प्रा.अशोक उईके, तानाजी सावंत यांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. योगेश सागर, मावळचे आमदार संजय बाळा भेगडे, परिणय फुके यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

रिपाईतर्फे दलित पंथरचे सदस्य, अविनाश महातेकर यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. भाजप १० सेना २ आणि रिपाई १ असा फॉर्मुला ठरला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केले जाईल असे बोलले जात होते, मात्र त्यांचा समावेश झालेला नाही.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. या फेरबदलात आठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. आज एकूण 13 जणांचा शपथविधी संपन्न होईल. यामध्ये विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचादेखील समावेश आहे. सोमवारपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरू होत आहे.