मंत्रीपदासाठी रामदास आठवले निश्चित?; अमित शहांनी केला फोन

0

नवी दिल्ली : आज नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा आहे. ते दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ देखील शपथ घेणार आहे. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 65 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये आधीच्या 21 मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असून 20 तरी नवीन चेहरे असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून रामदास आठवले हे देखील मंत्रीपदाकडे आस लावून बसले आहेत. मात्र, आठवले हे मंत्रिपदासाठी भाजप अध्यक्ष अमित शहांच्या फोनची वाट पाहत होते. अखेर शहांचा आठवले यांना फोन आला आहे. आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 4.30 वाजता भेट घेणार आहेत. याचवेळी मोदींच्या मंत्रीमंडळातील समाविष्ट होणारे खासदारही मोदींची भेट घेणार आहेत.

रामदास आठवलेंना मंत्रीपद मिळणार या आशेने सकाळपासून हार-तुरे घेऊन कार्यकर्ते जल्लोषाच्या तयारीत होते. मात्र, आठवलेंना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा फोन न आल्याने या आशेवर विरजण पडल्याचे जाणवत होते.