मुंबई: दोन दिवसांपूर्वी ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात अनेक दिग्गज नेत्यांना स्थान मिळालेले नाही. शिवसेनेतील नाराजी समोर येत आहे. तब्बल डझनभर शिवसेना नेते नाराज आहेत. दरम्यान नाराज नेते मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. सुनील प्रभू, भास्कर जाधव, सुनील राऊत,रवींद्र वायकर, दीपक केसरकर, रामदास कदम, दिवाकर रावते, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, अनिल बाबर, संजय शिरसाठ हे नेते नाराज असून ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हस्तक्षेप असल्याची शंका या नेत्यांना असून ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांनाच अधिक आणि महत्त्वाची खाती देण्यात आली असल्याची कुरबुर शिवसेनेत सुरु आहे.