मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट !

0

नवी दिल्ली: महाविकास आघाडीच्या सरकारमधील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे त्यांच्या निवासस्थानी गेले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट झाली. आदित्य ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत दोन्ही नेते महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच तीन पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल सरकार सुरळीत चालवण्यासंबंधीही चर्चा होऊ शकते.