‘बर्थ डे बॉय’ पाहताच मारली मिठी ; राजकीय प्रवासासाठी दिल्या सदिच्छा
भुसावळ: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दादर-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसने गुरुवारी पहाटे चारलाच भुसावळ गाठले. दौरा नियोजित असलातरी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांना सरप्राईज व्हिजीट देत शुभेच्छा द्यावयाच्या असल्याने त्यांनी स्थानकावर बर्ड डे बॉय कुठे आहे? विचारणा करीत अनिल चौधरींचे निवासस्थान गाठले. पहाटे चार वाजता मंत्री महाजन आल्याचे पाहून चौधरींना धक्का बसला तर उभयंतांनी एकमेकांनी मिठी मारल्याचे पाहून कार्यकर्तेही भारावले. प्रसंगी केक कापून उभयंतांनी एकमेकांना तो भरवला. प्रसंगी उपस्थितांचा परीचय करून घेण्यात आला. तब्बल दोन तास त्यांनी विविध विषयांवर चर्चा करून चौधरींना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत ते कारने जामनेरकडे रवाना झाले. प्रसंगी युवा कार्यकर्ता सचिन चौधरी, डॉ.वसंत झारखंडे, संतोष (दाढी) चौधरी, उल्हास पगारे, अशोक (आऊ) संतोष चौधरी, अॅड.तुषार पाटील, दुर्गेश ठाकूर, सिकंदर खान, कैलास चौधरी, रंगलाल पवार, ऋषी शुक्ला, भागवत सावकारे, प्रमोद धनगर, प्रफुल्ल वारके आदींची उपस्थिती होती.
बंधू प्रेम ; अनिल चौधरींना वाढदिवशी फॉर्च्यूनर भेट
वाढदिवसानिमित्त माजी आमदार संतोष चौधरी यांनी अनिल चौधरी यांना गुरुवारी फॉर्च्यूनर भेट दिली. प्रसंगी डॉ.वसंत झारखंडे, युवा नेतृत्व सचिन चौधरी यांच्यासह विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
शुक्रवार पहाटेपासून शुभेच्छांचा वर्षाव
चौधरी यांच्या हितचिंतक व कार्यकर्त्यांनी पहाटेपासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. शहरात रक्तदान शिबिर, फळ वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी यावलला टँकरचे लोकार्पण तर फैजपूरला ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.