मंत्री गिरीश महाजनांनी धरला लेझीम वर ठेका

0

जामनेर । शहरातील भिमनगरातून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भिमनगर मधील मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमीत्ताने विशाल शोभायात्रेचे(मिरवणुक) आयोजन करण्यात आले होते. भिमनगर पासून बजरंगपुरामार्गे शहराच्या मुख्य मार्गांवरून ढोल, ताशे, डिजेसहित विवीध वाद्यवृंदाच्या गजरात व जयघोषाने शहर दणाणुन गेले होते,शोभायात्रेमधील ढोल-ताशे व भिम गितांच्या तालावर लेझीम हातात घेऊन मंत्री गिरीश महाजनांनी ईतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत चांगलाच ठेका धरला. यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांमधे भाजपचे चंदु बावीस्कर, प्रा.शरद पाटील, जितु पाटील, छगन झाल्टे, महेंद्र बावीस्कर, नितीन रणीत, अजय सुरवाडे, सचीन सुरवाडे, आदर्श इंगळे, वसंत सुरवाडे, मन्साराम इंगळे, रमेश सुरवाडे, सुभाष सुरवाडे, पहादु सुरवाडे, गोपाळ भिमडे, महेंद्र मोरे, मुकूंदा सुरवाडे, संतोष सुरवाडे, चंद्रमणी पानपाटील, महेंद्र रणीत, राहुल सुरवाडे, बंटी वाघ, समाधान वाघ, डॉ.प्रशांत भोंडे, भगवान सोनवणे आदी उपस्थित होते.