अहमदनगर – पंडीत दिनदयाळ उपाध्याय कार्य विस्तार योजना अंतर्गत मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, वि.जा.,भ.जा.,इ.मा. व वि.मा.प्र. कल्याण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा. राम शिंदे साहेब यांनी मवेशी ता. अकोले जि. अहमदनगर येथे भेट दिली. मवेशी गावात मंगळवारी प्रा. राम शिंदे साहेब मुक्कामी होते. मंगळवारी सायंकाळी व बुधवारी सकाळी प्रा. राम शिंदे यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. गावातील जलसंधारणाच्या कामांना भेटी दिल्या. वृक्षारोपणही केले.
सदर भेटी दरम्यान नांगरणी करणार्या शेतकर्याला पाहुन त्यांनी उत्स्फुर्तपणे नांगरणी केली व आपण मंत्री असलो तरी शेतकरीच असल्याचे दाखवून दिले. यावेळी जि.प. सदस्य जालिंदर वाकचौरे, डॉ. लहामटे, अशोक भांगरे, सिताराम भांगरे इ. उपस्थित होते.