जळगाव। ना. गिरीष महाजन हे भाजपच्या बैठकीला येण्यासाठी भुसावळमार्ग निघाले असतांना तरसोदफाट्यााजवळ त्यांना वाहतुकीस अडथळा झाल्याचे दिसले. विस्कळीत झालेली वाहतुक पुर्ववत करण्याच्या अनुषंगाने मंत्री महाजन हे कारमधुन उतरून महामार्गावर उतरले.
कठडे तुटलेल्या पुलापर्यत ते पायीचनिघाले. पुलावर अडकून पडलेला ट्रक मागे घेतल्याशिवाय मार्ग सुरळीत होणार नाही,असेत्यांच्या नजरेने हेरल्यानंतर त्यांनी बंद पडलेल्या ट्रकला मागे घेण्याची सुचना चालकास केली तत्पूर्वी मागे असलेली वाहनेही मागे घ्यावी लागणारहोती. तसा प्रयास मंत्री महाजन आणि त्यांच्या सहकार्यांनी केला. ट्रक मागे सरकल्यानंतर वाहतुक हळुहळु सुरळीत होऊ लागली. तब्बल पंचवीस मिनीटे महामार्गावर थांबून त्यांनी वाहनांना मार्गस्थ करण्यासाठी चालकांना गाईड लाईन देण्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे पुढे घुसखोरी करणार्याचालकांना लगाम बसला तसेच वाहतुकीला शिस्तीचे स्वरूप आले. दोन्ही बाजूची वाहतुक सुरळीत झाल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर श्री महाजन भाजपच्या बैठकीला उपस्थित होण्यासाठी जळगावकडे मार्गस्थ झाले.