मुंबईः सांगलीसह कोल्हापूर, सातारा येथे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी सरकारी यंत्रणा पूरग्रास्तांची मतद करत आहे. दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची असंवेदनशीलता एका व्हिडीओच्या माध्यमातून चव्हाट्यावर आली आहे. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेले मंत्री महाजन चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत जणू पर्यटन सहलीलाच निघाले की काय, अशा आविर्भावात फिरताना दिसत आहेत. त्यानंतर आता विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून मंत्री महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे..
सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! ‘त्या’ लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येते. मंत्री महोदय मात्र सेल्फी काढण्यात मग्न आहेत. यांना लाज कशी वाटत नाही. मंत्री महाजन यांना थोडीशी जरी संवेदना असेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.