मंत्री विनोद तावडेंच्या राजीनाम्याची मागणी

0

यावल । राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात अलपसंख्यांक मंत्री विनोद तावडे यांनी मुस्लिम समाजाला धर्माच्या नावावर आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका घेतल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावल तालुका महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण समितीतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

आरक्षण चौकटीतच
पाच टक्के मुस्लिम आरक्षण हे धर्माच्या नावावर नसून राज्यघटनेमध्ये कोणताही समाज जर सामाजिक-आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास व दुर्बल असेल तर त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. आरक्षणाला न्यायालयाने हरकत घेतलेली नाही. त्यामुळे आरक्षण हे कायदेशीर व घटनेच्या चौकटीत बसणारे आहे. निवेदनावर आरीफ खान, राजू शेख, एम.डी.आसीफ, समीर शेख, अन्वर खाटीक, शेख बशिर, कलीम शेख यांच्यासह अन्य मुस्लीम बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.