मंत्र्यांना परराज्यातील दौऱ्याची माहिती कळविणे अनिवार्य

0

मुंबई : राज्यातील मंत्री आणि राज्यमंत्री अन्य राज्यात दौऱ्यावर जात असतील तर यापूर्वी राजशिष्टचार विभागाला कळवावे लागत होते. मात्र आता शासनाने नवे परिपत्रक काढून यात सुधारणा केल्या आहेत नव्या आदेशानुसार आता संबंधीत मंत्री यांनी ते ज्या राज्याच्या दौऱ्यावर जात असतील तर त्या राज्याच्या मुख्यसचिव आणि पोलिस महासंचालक यांना त्यांचा नियोजित दौऱ्याचा कार्यक्रम कळवावा लागणार आहे.

परीपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, पूर्वीच्या पध्दतीनुसार राजशिष्टाचार विभागाला मंत्र्याचा दौरा कार्यक्रमात आयत्यावेळी काही बदल झाले तर कळविले जात नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बदलांची कल्पना नसल्याने राजशिष्टाचार विभाग संबंधित राज्यांना विचारणा करते आणि त्यातून त्यांना अपूरी माहिती असल्याने गोंधळ निर्माण होतो हे टाळण्यासाठी आता मंत्र्यांना अन्य राज्यातील दौऱ्यांची माहिती देण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. नव्या वर्षापासून शासनाचे हे आदेश लागू होणार असल्याचे देखील या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.