मंत्र्याच्या चालकाने घरावर हल्ला केला : डॉ पाटील

0

जळगाव : जिल्ह्यातील एका विद्यमान मंत्र्याच्या ड्रायव्हरने रुग्णालयात येऊन रुग्णावर उपचार का करीत नसल्याचा जाब विचारत शिवीगाळ करून रुग्णालय फोडण्याची धमकी दिली. राजकीय आशीर्वाद असल्याने दादागिरी करून दहशत निर्माण करून घरावर हल्ला केल्याचा आरोप पत्रकार भवनात आयोजित परिषदेमध्ये डॉ व्ही. आर. पाटील यांनी केला आहे. 1 जून गुरुवार रोजी पाळधी येथे डॉ व्ही आर पाटील यांच्या घरी रात्री.11 वाजता उपचार करण्यासाठी रुग्णाला घेऊन काही लोक आले. मात्र माझे ऑपरेशन झाले असल्याने मला आरामाची गरज असल्याचे उपस्थित लोकांना सांगितले. मात्र ते परिस्थिती समजून घेण्याच्या परिस्थिती मध्ये नसल्याने त्यांनी एका विद्यमान मंत्र्याचा ड्रायव्हर मिलिंद रामचंद्र सपकाळे याला बोलून आणले. त्याने घरी येऊन उपचार का करीत नसल्याचा जाब विचारात शिवीगाळ केली व रुग्णालय जाळून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून मला न्याय देण्यात यावा अशी मागणी डॉ पाटील यांनी केली आहे.