शहादा । तालुक्यातील मंदाणा येथील एका शेतकर्याची कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिलीप पंडीत बिरारे असे या शेतकर्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप बिरारे यांना तीन मुली असून पहिल्या मुलीचे लग्न कर्ज काढून केले होते. त्यात त्यांचा पत्नी यांना किडनीचा आजार जडला त्यांचावर मोठा खर्च झाला पण त्या आजारपणातच काही महिन्यापुर्वी मृत्यु झाला होता. असे अनेक एकामागुन एक संकट त्यांच्यावर ओढवले होते. शेतात कापुस लावला बोंड अळीचा प्रादुर्भावाने त्या पीकाचे देखील नुकसान झाले व उत्पन्न आले नाही. आपिण पुन्हा कर्जात वाढ झाली व कर्जमाफीचा यादीत त्यांचे नाव बँक तथा सोसायटीच्या लिस्टमध्ये आले नाही. (कर्जमाफीचा फॉर्म भरले असल्याची माहिती देखील मिळाली) त्यामुळे हताश झाले होते. दुसरी मुलगी आम्रपाली हीचे लग्न जुळुन आले होते आता कसे होईल हा प्रश्न त्याना सलत होता व तसा प्रकार ते ग्रामस्थामध्ये बोलुन दाखवत होते. त्यामुळे 15 जानेवारी रोजी ते आपल्या वृध्द आईचा पाया पडुन न जेवता शेतात निघुन गेले. मुलाचा तपास करण्यासाठी त्या वृध्द आईने भीमराव यास तुझे वडील शेतात न जेवता निघुन गेल्याचे सांगितले. भीमराव शेतात गेला असता त्यास वडिल दिलीप बिरारे हे शेतातील विहीरी जवळ अत्यावस्थ अवस्थेत दिसुन आले. त्याने लगेच वडिलाना मंदाणा पीएच.सी. तेथुन शहादा येथील खाजगी रुग्नालयात दाखल करण्यात आले. 25 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान त्यांच्या मृत्यु झाला. कर्जबाजारी असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याने परिसरात व शेतकर्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दिलीप बिरारे व त्याचा परिवारास योग्य न्याय मिळावा यासाठी शासन दरबारी मागणी व्हावी, अशी चर्चा होत आहे.