दोंडाईचा (जयपालसिंह गिरासे) । 84 दुष्काळी तालुकयापैकी एक अशी धुळे जिल्हातील शिंदखेडा तालुक्याची ओळख. त्यात पिण्याची पाण्याची वानवा. तेथे शेतीसाठी मोजकेच पाणी. शेतात ठिबक सिंचनाच्या माध्यमातुन थोडे बहु उत्पादन मिळुन किमान पोटाची खळगी तरी भरेल. एवढ्या उत्पादनाच्या आशेने मंदाणे ता. शिंदखेडा येथील वृध्द शेतकरी दामपत्य रजेसिंग भगवानसिंग गिरासे व सौ. सुमनबाई गिरासे. यांनी स्टेट बॅक ऑफ इंडीया दोंडाईचा, शाखेकडून ठिबकचे कर्ज घेतले. व शेतात ठिबक सिंचन केले. मात्र उत्पादनाच्या आधीच पहिल्याच पाऊसात ठिबकच्या नळ्या सह पाईप वाहुन गेल्याणे एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. आणि रजेसिंग गिरासे व सुमनबाई गिरासे या वृध्द दामपत्यावर आभाळच कोसळले. आता जगावे की मरावे हा एकच प्रश्न या कृषी क्षेत्रातील नटसम्राटापुढे ठाकला आहे. त्यांची एकच विनवणी आहे की, आम्हाला न्याय मिळेल का न्याय. न्याय देवतेला आमचे दुख कळेल का? कुणी आम्हाला न्याय मिळवुन देईन का?84 दुष्काळी तालुकयापैकी एक अशी धुळे जिल्हातील शिंदखेडा तालुक्याची ओळख. त्यात पिण्याची पाण्याची वानवा. तेथे शेतीसाठी मोजकेच पाणी. शेतात ठिबक सिंचनाच्या माध्यमातुन थोडे बहु उत्पादन मिळुन किमान पोटाची खळगी तरी भरेल. एवढ्या उत्पादनाच्या आशेने मंदाणे ता. शिंदखेडा येथील वृध्द शेतकरी दामपत्य रजेसिंग भगवानसिंग गिरासे व सौ. सुमनबाई गिरासे. यांनी स्टेट बॅक ऑफ इंडीया दोंडाईचा, शाखेकडून ठिबकचे कर्ज घेतले. व शेतात ठिबक सिंचन केले. मात्र उत्पादनाच्या आधीच पहिल्याच पाऊसात ठिबकच्या नळ्या सह पाईप वाहुन गेल्याणे एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. आणि रजेसिंग गिरासे व सुमनबाई गिरासे या वृध्द दामपत्यावर आभाळच कोसळले. आता जगावे की मरावे हा एकच प्रश्न या कृषी क्षेत्रातील नटसम्राटापुढे ठाकला आहे. त्यांची एकच विनवणी आहे की, आम्हाला न्याय मिळेल का न्याय. न्याय देवतेला आमचे दुख कळेल का?
कुणी आम्हाला न्याय मिळवुन देईन का?
शिल्लक होते ते शेतीत टाकुन फकीर झालो दोन वर्षांपासुन शासनदरबारी पायपीट करत असुन आता थकलो आहे. आता एसटी भाडे व पाटपुराव्यासाठी कागदपत्रांच्या झेरॉक्स काढायला सुध्दा पैसा नाही. या वयात मोल मजुरी करत पोटाची खळगी भरतोय. आता प्रवास करण्याचे दखील वय राहीले नाही. गुडघे चालु देत नाही. जवळ जे काही थोडे बहुत शिल्लक होते ते शेतीत टाकुन फकीर झालो. या वयात आत्महत्या करणे देखील शक्य नाही. पुढे आयुष्य कसे जाईल ति चिंता लागुण आहे. न्याय मागण्यासाठी कोर्टात जाणार होतो. तेथे वकील लावायला पैसा नाही. तर न्याय मिळेल तो पर्यंन्त मी जिंवत राहील याची शाश्वती नाही. मी माझ्या जिवाचे काही केल्यास माझ्या सुमनचे आयुष्य नरक होईल. एकमेकांना आधार देत जिवन जगतोय आणि या देशात न्याय मिळणे किती कठीण आहे. याचा आम्ही दोघी अनुभव घेतोय. कॅबीनेट मंत्री जयकुमार भाऊ तरी आता मंत्री म्हणुन न्याय मिळवुन देतील एवढीच एक आशा आता शिल्लक आहे.
रजेसिंग भगवासिंग गिरासे, नुकसानग्रस्त शेतकरी
नुकसान होवुन 20 ते 25 दिवसांनी पंचनामाशेतातील ठिबकच्या नळ्या व पाईप वाहुन गेल्यावर शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल. या आशेपोटी रजेसिंग गिरासे यांनी त्याच दिवशी शिंदखेडा तालुका कृषी कार्यालय व तहसिलदार यांचे कार्यालय गाठुन तेथील अधिकार्यांना आपबिती सांगितली. मात्र अधिकार्यांच्या वतीने मदत न करता उडवा-उडवीची उत्तरे मिळाली. आणि तेथुनच श्री. गिरासे यांची खर्या संघर्षाची सुरूवात झाली. अधिकारी दाद देत नसल्याने व नुकसान होवुन पंधरा /वीस दिवस उलटुन गेल्याणे साधा पंचनामा देखील केला जात नाही म्हणुन श्री. गिरासे यांनी तत्कालीन तहसिलदार यांच्या समोर आपली कैफियत मांडली व त्यांना तशी लेखी तक्रार देत आमदार जयकुमार रावल यांचे यांचे पत्र जोडले. तेव्हा 20 ते 25 दिवसात तत्कालीन मंदाणे येथील तलाठी व कृषी सहाय्यक अहिरराव यांनी दि.7/10/2015 रोजी. एवढा वेळ लोटुन गेल्यावर पंचनामा केला. मात्र हा पंचनामा शासनाच्या इतर कागदाप्रमाणेच फाईल बंद झाला. येथे ही लालफितीचा कारभार गिरासे यांना पाहायला मिळाला. व हा पंचनामा गिरासे यांना नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी निरूपयोगी ठरला. आजही गिरासे यांच्या नुकसान भरपाई मिळेल या आशेपोटी शासनाच्या दरबारी पायपीट चालुच आहे.
शेतकरी आत्महत्येला जबाबदार कोण? निसर्गाचा लहरीपणा आणि दिवसेंदिवस वाढणार्या खते, बियाणे, मजुरीच्या किमंती व त्या मानाने मिळणार्या शेतमालाचा नगण्य भाव. तर शेतात सडून जाणार्या शेतीमालाने बळीराजा पुरता बेजार झाला आहे. असे असतांना त्यात भरीस भर म्हणुन नैसर्गिक आपत्ती व अस्मानी संकट शेतकर्यांचे जिवन उदवस्त करून जात आहे. शासनदरबारी शेतकर्याला न्याय न मिळता अधिकारी शेतकर्याला प्रश्न विचारून हैराण करीत आहेत.
पोट भरण्याचा प्रश्न तेथे कर्ज कसे फेडायचे रजेसिंग गिरासे यांची दोंडाईचा शहरापासुन पाच कि.मी वर मंदाणे-बाम्हणे रोडवर शेती आहे. यापैकी गट क्रं.159/2 क्षेत्र,0.45 आर, तर सुमनबाई गिरासे यांच्या नावावर असलेले गट क्रं.160/2 अ क्षेत्र 0.74 एवढे क्षेत्र आहे. या अल्पभुधारक शेतकरी दामपत्याचा उदरनिर्वाह ह्याच शेतीच्या उत्पादनावर अवलंबुन आहे. मोठ्या हौसेने व गरजेखातर आपल्या पदरातील व बॅकेकडून कर्ज घेवुन सारे पैसे टाकुन शेतात ठिबक सिंचन केले. मात्र दि.16 व 17 सप्टेंम्बर 2015 रोजीच्या पहिल्याच मुसळदार पाऊसाने गिरासे दामपत्याच्या शेतातील मातीच्या 5 ते 6 इंचाचा स्तरासह शेतातील ठिबकच्या नळ्या व पाईप वाहुन नेले. या मुसळदार पाऊसात या कुटुंबाचे आयुष्यच वाहुन गेले. एका क्षणात डोळ्यादेखत होत्याचे नव्हते झाले. नुकसान पाहुन हे शेतकरी कुटूंब मानसिक व शारिरिक दोन्ही बाजुने थकले आहे. आता पुढे काय? जेथे पोट भरण्याचा प्रश्न आहे. तेथे कर्ज कसे फेडायचे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणुन या दामपत्याची कागदपत्र घेवुन तसेच रोजची मजुरी बुडवून दोन वर्षांपासुन शासनदरबारी नुकसान भरपाईसाठी पायपीट चालु आहे. मात्र शासनाला दोन वर्षांत देखील दखल घ्यायला वेळ नाही.