मंदिरपासून कलेक्टोरेटवर मोर्चा

0

धुळे । शिवाजी रोडवरील महाकाली मंदिर व शितलामाता मंदिर अतिक्रमण ठरवून ती तीन दिवसात काढून घेण्याची नोटीस अपर तहसिलदारांनी मंगळवारी बजावली. या नोटीसीने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंदिर बचाव कृती समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून मंदिर वाचविण्यासाठी प्रसंगी अंगावर बुलडोझर चालले तरी मागे न हटण्याचा निर्धार बुधवार, 23 रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आला. शिवाय प्रशासनाला रितसर निवेदनही देण्यात आले. यावेळी भाविकांची उपस्थिती होती.

निवेदनातील आश
शिवाजी रोडवरील महाकाली मंदिर व शितलामाता मंदिर पाडण्याची नोटीस प्रशासनाने बजावल्याने जनतेच्या भावना तीव्र बनल्या आहेत. मंदिर न पाडता पर्यायी मार्गाने रस्ता करावा यासाठी 16 मे रोजीच शहरवासियांनी बंद पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तरीही आमदाराच्या दबावाला बळी पडून प्रशासन सामंजस्याऐवजी ताठर भूमिका घेत आहे. वास्तविक, हे प्रकरण हरित लवादाकडे प्रलंबित असतांना ही कारवाई होणे अपेक्षीत नाही. मात्र तरीही मंदिरे पाडण्याची कृती झाल्यास जनक्षोभ होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवून प्रशासन हेकेखोर पणाने कारवाई करणार असेल तर वेगळ्या पध्दतीने विरोध करावा लागेल, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

गाभार्‍यात मांडणार ठिय्या
मंगळवारी दुपारी प्रशासनाने या मंदिरांवर नोटीस चिटकविल्यानंतर भाविकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तर बुधवार 23 रोजी सकाळी 10 वा. मंदिर आवारात व्यापक बैठक झाली. या बैठकीत मंदिर वाचविण्यासाठी घ्यावयाच्या भूमिकेची निश्‍चिती झाली. त्यानुसार बुधवार, 23 रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देवून तर 24 रोजी सायंकाळपासून मंदिराच्या गाभार्‍यात ठिय्या आंदोलन करीत प्रसंगी बुलडोझरसमोर आडवे पडण्याचा निर्धार करण्यात आला. त्यानंतर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढीत निवेदन देण्यात आले.

मोर्चातील सहभागी
महेश मिस्तरी, हिरामण गवळी, मनोज मोरे, पुरूषोत्तम जाधव, गुलाब माळी, सनी भापकर, संजय वाल्हे, भिकन वराडे, मिलींद मुंदडा, संदीप सुर्यवंशी, संतोष चौधरी, कल्पना गंगवार, हेमा हेमाडे, डॉ. दिपा नाईक, अनिल गायकवाड, ईश्‍वर पवार, सुनिल चौधरी, राजेंद्र बुरकुले, शेखर मराठे, रोहित सोनार, संजय जगताप, आर.बी. बुरकुले, संदीप शिंदे, प्रितेश अग्रवाल, रितेश दिक्षीत, ललीत कोरके, अजय पाटील, मोसब्या आप्पा गवळी, सतिष पाटील, भुषण काजगे, कुणाल पवार, महेंद्र शेणगे, सागर जोशी, धनराज जोशी, के.बी. अग्रवाल, रमेश कासार, विजय काळे, आबा भडागे, सुरेश देशपांडे, अनिल दिक्षीत, प्रल्हाद जोशी, सुरेश सुर्यवंशी, अक्षय वराडे, सुनिल आगलावे, संदीप पोतदार, योगेश चौधरी, कमलेश मराठे आदींचा सहभाग होता.