वरणगाव। येथून जवळच असलेल्या बोहर्डी खुर्द येथील नवनाथ मंदीराच्या सभा मंडपासाठी आमदार एकनाथराव खडसे यांनी सन 2015 मधे 10 लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला होता. मात्र सद्य स्थितीत या निधीचा वापर इतरत्र केला जात आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी या कामाचे भुमीपुजन खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
ग्रामस्थांमध्ये नाराजी
बोहर्डी खुर्द येथील नवनाथ मंदीराच्या सभा मंडपासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी अर्धा निधी गावातील काही मंडळी सप्तश्रृंगी मंदीरासाठी वापरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत आहे. निधी ज्या कामासाठी मंजुर झाला आहे. त्याच कामासाठी निधीचा वापर करावा असे गावकर्यांचे म्हणणे आहे. तरी अभियंता कुरेशी यांनी या रकमेचा इतर ठिकाणी वापर करू नये खासदार व आमदारांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांनी केली होती मागणी
यात आमदार एकनाथराव खडसे यांनी नवनाथ मंदिरासाठीच हा निधी मंजूर केला होता. यासाठी गावकर्यांनी आमदार खडसे यांची भेट घेऊन मंदिराच्या विकासासाठी निधी मिळण्याची मागणी केली होती. त्यानंतर या निधीला मंजूरी मिळाली होती. मात्र आता हा निधी इतरत्र वळविला जाणार असल्याचे बोलले जात आहे.