मंदिराचे पदाधिकारी व घर बचाव संघर्ष समिती समन्वयक यांची न्यायालयात धाव

0

पिंपरी चिंचवड : प्राधिकरण प्रशासनाने उद्या दिनांक २७ डिसेंबर २०१८ रोजी बिजलीनगर येथील गणेश मंदिर आणि तुळजाभवानी मंदिरे पाडण्यासाठी तसेच ब प्रमाणित निष्काशन करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त मागविला आहे. त्यासंदर्भातील हालचालही प्रशासनाकडून सुरू आहे. परंतु नैसर्गिक न्यायतत्वानुसार सदरची कारवाई एकतर्फी दिसून येत असल्याकारणाने मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी व घर बचाव संघर्ष समिती समन्वयक यांनी न्यायालयाकडे धाव घेतली आहे. या संदर्भात आता न्यालाययाने दोनही बाजूकडील संबधितांना ३१ डिसेंबर २०१८ रोजी कोर्टामध्ये हजर राहण्यास सांगितले आहे.

घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयासही सदर बाबत तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत दखल घेतली असून गृह खाते आणि नगरविकास खात्यास सूचित केलेले आहे. त्यामुळे उद्याची मंदिरांवर “हातोडा” कारवाई करू नये असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. प्राधिकरण प्रशासनास सदर बाबतची न्यायालयीन कागदपत्रे पोहच झाली असून न्यायालयीन प्रक्रियेचा त्यांनी सन्मान ठेवावा व अतिक्रमण कार्यवाही करू नये असे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.