भुसावळ। येथील बाजारपेठ पोलिसांनी रात्र गस्तीत मंदिराच्या घंटा चोरणार्या दोन भामट्यांना गजाआड केले असून त्यांना फैजपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, नरेंद्र साबळे, हेड कॉन्स्टेबल निशिकांत जोशी, आनंदसिंग पाटील, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण, राहूल चौधरी, बंटी कापडणे व अनिल पाटील यांच्या पथकाने गस्तीत संशयितरित्या फिरणार्या शेख कमरुद्दीन अलाउद्दीन व राजू तडवी उर्फ सिलॉन या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 32 मंदिराच्या घंट्या, 1 दिवा, 1 पितळी कळस, 2 पितळी थाळ्या, 1 चांदी मुकूट, करवत व कुलूप जप्त केला. फैजपूर येथील एका मंदिरातून हे साहित्य चोरट्यांनी लांबविले होते. या दोघांना फैजपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.