पुणे । कोथरूड परिसरातील प्राचीन शुभंकर महादेव मंदिरात चोरी करून दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेणार्या दोघांना कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा प्रकार 9 ऑगस्टच्या पहाटे सव्वाचार वाजता भेलकेनगर येथे घडला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ओंकार बापू गायके (19), समीर सिकंदर राऊत (20, दोघेही रा. कोथरूड) यांना अटक केली आहे. याप्रकरणी अनिल परांजपे (40, रा. भेलके नगर) यांनी फिर्याद दिली आहे. कोथरूडमधील शुभंकर अपार्टमेंटमध्ये राजेंद्र मोहिते (रा.पद्मावती) यांच्या मालकीचे प्राचीन शुभंकर महादेव मंदिर आहे. याचे कुलूप तोडून आत प्रवेश करून त्यांनी कटरच्या सहाय्याने दानपेटी उचकटून त्यातील 19 हजार 877 रुपये चोरून नेले. दरम्यान चोराला पळून जात असताना सोसायटीतील वॉचमन रंजन शुक्ला याने पकडले. यावेळी त्याचे इतर साथीदार पळून गेले.