मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
राज्यातील आघाडी सरकार तर देव-धर्म विरोधी ; भाजपा पदाधिकार्यांनी केली खोचक टिका
भुसावळ : महाआघाडी सरकारच्या हिंदुत्व विरोधी धोरणामुळे आज महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद आहेत त्यामुळे नाकर्त्या सरकारमुळे सर्व देव बंदिस्त झाले आहेत. या निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी तसेच देवा-धर्माची मंदिरे बंद करून सातत्यानं अन्याय करणार्या जुलमी ठाकरे सरकारला जाग येण्यासाठी भुसावळ शहर व विभागात भाजपातर्फे टाळ, घंटा वाजवून मंदिरांबाहेर शंखनाद आंदोलन करण्यात आले.
दार उघड उद्धवा दार उघड : भुसावळात आंदोलन
भुसावळ : भुसावळ शहर भाजपातर्फे शहरातील मंदिरे उघडण्यासाठी जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिरासमोर आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार विरोधात टाळ, घंटा, शंख वाजवत आंदोलन करण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, शैलजा पाटील, अजय भोळे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, गिरीश महाजन, प्रा.दिनेश राठी, राजेंद्र आवटे, नारायण रणधीर, सुरेश शर्मा, अर्जुन खरारे, सुरेश कुटे, मुकुंदा निमसे, सुनील सोनवणे, पवन बुंदेले, बिसन गोहर, गिरीश पाटील, प्राफविलास अवचार, नरेंद्र बर्हाटे, शिशिर जावळे, धनराज बाविस्कर, राहुल तायडे, चंद्रशेखर पाटील, प्रशांत देवकर, मंगेश पाटील, राम माहुरकर, प्रसन्न पांडे, संतोष आव्हाड, युवा मोर्चाचे अनिरुद्ध कुलकर्णी, श्रेयस इंगळे, नंदकिशोर बडगुजर, चेतन बोरोले, अमित असोदेकर, चेतन सावकारे, गोपीसिंग राजपूत, अथर्व पांडे, मयूर अंजाळेकर, मयुर सावकारे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.