मंदिरे बंद : प्रशासनाकडून धडक कारवाई

0

भुसावळ : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनंतर जिल्हाधिकार्‍यांनी 22 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान रात्री 11 ते 5 संचारबंदीसह शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर केल्यानंतर स्थानिक स्तरावरील प्रशासनाला धडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर भुसावळात पहिल्याच दिवशी सोमवारी रात्री तीन व्यावसायीकांवर पोलिस व पालिका प्रशासनातर्फे धडक कारवाई करण्यात आली. दुसरीकडे यावल तालुक्यातील अट्रावलचा मुंजोबा यात्रोत्सव रद्द करण्यात आला तसेच मनुदेवी येथील मंदिरही बंद करण्यात आले असून भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भुसावळात तिघा व्यावसायीकांना दंड
भुसावळ :
जिल्हाधिकार्‍यांनी संचारबंदी जारी करताच पहिल्याच दिवशी भुसावळात पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी पथकासह धडक कारवाईला सुरूवात केली. रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांसह हॉटेल्स, ढाब्यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमीयर प्राईड, फेमस डेअरी चालकासह हॉटेल वैष्णवी चालकावर नियमांचे उल्लंघण केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली.

अट्रावलचा मुंजोबा यात्रोत्सव रद्द
यावल :
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील अट्रावल येथील मुजोंबाचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. सोमवारी मुंजोबाचा वार असल्याने भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली मात्र वाढती गर्दी पाहता तहसीलदार महेश पवार व यावलचे निरीक्षक सुधीर पाटील यांनी देवस्थान समितीला 10 हजार रुपयांचा दंड करून मंदिर बंद केले. मंदिर बंद झाल्याने भाविकांना माघारी फिरावे लागले.

स्वयंपाकाच्या सामानासह भाविक परतले
अनेक भाविकांचे सोमवारी मान असल्याने स्वयंपाकाच्या
सामानासह मंदिर परीसरात भाविक आले होते मात्र परीरातून भाविकांना परतावे लागले. काहींनी मानाचा स्वयंपाक मंदिरापासून दुरवरच्या शेतामध्ये करीत तेथूनच मुंजोबाला नैवेद्य प्रदान केला. मंदिर शासनाकडून बंद केल्याचे भाविकांना माहित नसल्याने दिवसभर भाविक अट्रावलपर्यंत गेले माात्र पोलिसांनी मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर बॅरीकेटस् लावून ठेवल्याने गावापासूनच भाविकांना माघारी फिरावे लागले. पोलिस निरीक्षक सुधील पाटील व सहकारी तसेच मंदिर समिती देवस्थान परीसरात दिवसभर थांबुन भाविकांना त्यांनी परत जाण्याचे आवाहन केले.

यावलमध्ये लग्न मंडपात कारवाईच्या अक्षदा
यावल :
जिल्ह्यात कोरोनाचा होत असलेल्या उद्रेकानंतर जिल्हाधिकार्‍यांनी कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर यावलमध्ये प्रशासन अ‍ॅक्टीव्ह मोडवर आले आहे. तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा महाराज देवस्थानवर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रोत्सव रद्द असतांनाही सोमवारी भाविकांची गर्दी उसळल्याने तहसीलदार महेश पवार यांनी विश्वस्त समितीकडून दहा हजारांचा दंड वसूल केला. तसेच गंगानगरात एका विवाह सोहळ्यात आणि माधवनगरात एका जाऊळाच्या समारंभात 50 पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्याने नगरपालिका प्रशासनाकडून दोन्ही ठिकाणी प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

दुकानदारांवरही धडक कारवाई
शहरात 13 दुकानदारांकडून प्रत्येकी 00 प्रमाणे एकूण साडे सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पोलिस प्रशासनानेदेखील कारवाई करत 31 जणांकडून प्रत्येकी दोनशे प्रमाणे सहा हजार दोनशे रुपयाचा दंड वसुल केला आहे तर गेल्या दोन दिवसात 30 जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे 15 हजाराचा दंड वसुुल करण्यात आला.

सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद
यावल : कोरोना रुग्णांची सातत्याने वाढत जाणारी रुग्ण संख्या पाहता यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर हे शासनाच्या पुढील आदेश होईस्तोवर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. बंद काळामध्ये कोणीही मंदिरात दर्शनासाठी अथवा मंदिर परीसरात येऊ नये, असे आवाहन मंदिर विश्वस्तांनी केलेले आहे. अट्रावलचे नवसाला पावणार्‍या मुंजोबाचे मंदिर सुद्धा कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. नागरीकांनी नियम पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आव्हान यावल तहसीलदार महेश पवार, नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी, यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे.यावल ः कोरोना रुग्णांची सातत्याने वाढत जाणारी रुग्ण संख्या पाहता यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर हे शासनाच्या पुढील आदेश होईस्तोवर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. बंद काळामध्ये कोणीही मंदिरात दर्शनासाठी अथवा मंदिर परीसरात येऊ नये, असे आवाहन मंदिर विश्वस्तांनी केलेले आहे. अट्रावलचे नवसाला पावणार्‍या मुंजोबाचे मंदिर सुद्धा कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. नागरीकांनी नियम पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आव्हान यावल तहसीलदार महेश पवार, नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी, यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे.