धुळे । जुने धुळे भागातील नदीच्या काठावरील कुठलाच अडथळा न ठरणार्या महांकालेश्वर महादेव मंदीरासह इतर मंदीरे पाडून झाल्यावर मंदीराच्या ठिकाणी आक्षेपार्ह वस्तू सापडल्या असे असे मोगलांनाही लाजवेल अशा घाणेरड्या प्रकारची मंदीर आश्रमाची महंतांची तसेच भक्तांची बदनामी करून एक प्रकारे हिंदू धर्मांची मानहानी करणारी बनावट रहस्यमय कथा, बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील आरोपी अनिल खोटे यांनी केला असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी आ. अनिल गोटे यांचे नाव न घेता प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे. याबाबतची माहिती 14 मे रोजी आयोजित जाहीर सभेत मांडणार असल्याचेही माळी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
अधिकार्यांचा खुलासा मंदीरात आक्षेपार्ह नाही
मंदीराच्या परिसरात आक्षेपार्ह काहीच मिळून आले नसल्याची प्रतिक्रीया पोलीसांनी दिली होती. तसेच मंदीर पाडणाची कारवाई करणार्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियांत्यांनी देखील असा लेखी खुलासा दिलेला आहे. असे असतांना आ. गोटे यांनी तळघरात काय काय सापडले याचे व्हीडीओ चित्रीकरण दाखवण्याची वल्गना करून 5 मे रोजी जाहीर सभेत नागरिकांना चित्रीकरण दाखविले. परंतु, यात आक्षेपार्ह काहीच न दिसल्याने दोन मिनीटांत ते चित्रीकरण बंद करण्यात आले असा आरोप माळी यांनी केला आहे. गुंड गुड्ड्यासाठी सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांना लावून देण्याची घोषणा केली होती यानुसार इथेही झाले पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. खोटे प्रकार करून हतबल झाल्यावर त्यांनी त्याच्या धर्मपत्नीचा आधार घेवून एक पोस्ट व्हायरल केली आहे असे पत्रकात म्हटले आहे.मंदीरे पाडल्यापासून ते आजपर्यंत सर्व प्रकार 14 मे रोजी आयोजित जाहीर सभेत समाचार घेणार असल्याचा इशारा माळी यांनी पत्रकात दिला आहे.