‘मकडी’ फेम श्वेता बासुही करणार लग्न

0

मुंबई : ‘मकडी’ या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद लवकरच लग्न करणार आहे.छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात करणारी श्वेताने अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटही केले आहेत. श्वेता ४ वर्षापासून फिल्ममेकर रोहित मित्तलला डेट करत होती आणि अखेर येत्या १३ डिसेंबर रोजी ती रोहितसोबत लग्न करणार आहे.

श्वेता आणि रोहित पुण्यात बंगाली आणि मारवाडी अशा दोन्ही पद्धतीने लग्न करणार असून यावेळी केवळ त्यांच्या जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत.