मकरसंक्रांत निमित स्वामीनारायण सत्संग मंडळातर्फे झोळीपर्व

0

नवापूर : मकरसंक्रांत निमित्त हिंदू धर्मातील शास्त्रनुसार दान करण्याला अधिक महत्व आहे. त्यानुसार बीएपीएस स्वामीनारायण संस्था संचालित येथील स्वामीनारायण सत्संग मंडळातर्फे झोळीपर्व म्हणून दान स्वीकारण्यात आले. वेद उपनिषद ,भागवत,वचनामृत ग्रंथामध्ये मकरसंक्रातीच्या दिवशी दान करण्याला अधिक महत्व सांगितले आहे. आपसातील कटुता विसरून तीळगुळाच्या आदान प्रदानटून मनामनात स्न्हेहभाव निर्माण करणारा अत्यंत शुभदिन म्हणून मकरसंक्रातीच्या दिवशी दान करण्याला विश्वभरात महिमा आहे. त्यानुसार बीएपीएस स्वामीनारायण सत्संग मंडळातर्फे झोळीपर्व दान स्वीकारण्यात आले.

नवापूर शहरातील नागरिकांनी या दान पर्वाला मोठा प्रतिसाद दिला, या मिळालेल्या सर्व दानाचा उपयोग उकाई येथील स्वामीनारायण छात्रालयातील विद्यार्थ्यांसाठी केला जातो. पूज्य प्रमुखस्वामी महाराज यांच्या प्रेरणेने भारतासह विविध देशात मकरसंक्रांतीला झोळीपर्व दिनाला दान स्वीकारण्यात आले.झोळी पर्वाच्या दान स्वीकारण्यासाठी निघालेल्या फेरीत मंडळाचे अध्यक्ष प्रा.आर. आर.पाठक,प्रदीप प्रजापत,कमलेश अग्रवाल,संजय अग्रवाल,छगन प्रजापत,हरीश प्रजापत,भटू जाधव,डॉ.नरेंद्र पाटील, महेंद्र जाधव,जितु सोनी ,किशोर प्रजापत,बापू मोरे, संजय अग्रवाल,राकेश प्रजापत,धनजी प्रजापत, संदीप सोनवणे,कांतु प्रजापत, नितीन पाटील,प्रणव पाटील प्रफुल प्रजापत,विपुल प्रजापत,मयूर पाटील,दर्शन सोनवणे व मंडळाचे सर्व सत्संगी बांधव सहभागी झाले होते.