मका खरेदीचा प्रश्‍न सोडवणार

0

रावेर : शासनातर्फे मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मका खरेदी बंद करण्यात आली आहे मात्र रावेरसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अद्याप शासनाकडे नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांकडील मक्याची खरेदी न झाल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजीची भावना आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांशी ‘जनशक्ती’ प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही शासनाकडे दोन वेळेला प्रस्ताव पाठवले असून बोलणे सुध्दा झाले आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा मका खरेदीसाठी शासनाकडे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आठशे शेतकरी वेटींगवर
रावेर तालुक्यातील बाराशे शेतकर्‍य2ांनी शासनाला मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती शिवाय एका वेळेला मुदतवाढ मिळाल्यानंतरदेखील तालुक्यातील 386 शेतकर्‍यांचा चार कोटी 57 लाखांचा 25 हजार 978 क्विंटल मक्याची खरेदी झाली तर सुमारे आठशे शेतकर्‍यांकडील मक्याची खरेदी अद्यापही बाकी आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत काही दिवसांपूर्वी रावेरात आले असतांना त्यांनी मका खरेदीला मुदतवाढ करण्याचे आश्वासन दिले होते.

मक्या संदर्भात नक्की सकारात्मक निर्णय होईल
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पुढे म्हणाले की, रावेर तालुक्यासह जिल्हातील इतर तालुक्यांमध्येदेखील शासनाकडून मका खरेदी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने तात्पुरती बंद केले आहे. आम्ही पुन्हा मुदतवाढ मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहेत. शासन मका खरेदी केंद्रासंदर्भात नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल, असा सकारात्मक विश्‍वास जिल्हाधिकार्‍यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना व्यक्त केला.

कापुस खरेदी केंद्र सप्टेंबर महिन्यात
कापूस खरेदी केंद्राच्यादेखील तांत्रिक बाबी सोडवण्यासाठी आम्ही जिल्हास्तरावरुन प्रयत्न करतीत आहोत. रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड या भागात कापूस खरेदी संदर्भात तांत्रिक अडचण आहे. या विषय ीसीसीआयशी जिल्हास्तरावरुन बोलणे सुरू असून सप्टेंबर महिन्यापर्यंत कापूस खरेदीबाबतदेखील निर्णय होईल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.