चार आठवडे अटक न करण्याचे अहमदाबाद खंडपीठाचे आदेश ; पोलिसांचे पथक रीकाम्या हाताने परतले
भुसावळ– भुसावळातील दोघा व्यापार्यांकडील मक्याची खरेदी केल्यानंतर तब्बल 70 लाख रुपये न दिल्याने व त्यापोटी दिलेले धनादेश न वटल्याने अहमदाबादस्थित अनिल स्टार्च प्रा.लि.कंपनीच्या चेअरमनसह दोघा संचालकांविरूध्द भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात रविवार, 3 डिसेंबर रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या अटकेसाठी अहमदाबादमध्ये पथक गेल्यानंतर आरोपींनी कारवाईपूर्वीच अहमदाबाद खंडपीठातून चार आठवड्यांपर्यंत अटक करू नयेचे आदेश मिळवल्याने पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
पिता-पूत्रांची झाली होती फसवणूक
भुसावळातील मक्याचे व्यापारी मका व्यापारी नरेंद्र (गुड्डू) अग्रवाल यांच्याकडील 36 लाख 61 हजार 408 रुपये किंमतीचा मका तसेच त्यांचा मुलगा अमित अग्रवाल यांच्याकडील 32 लाख 83 हजार 393 रुपये किंमतीचा मका अहमदाबादच्या व्यापार्यांनी खरेदी केला होता. सुरुवातीला आरटीजीएसने पैसे अदा करण्याची भूमिका आरोपींनी घेतली मात्र नंतर दिलेला धनादेशही न वटल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदाबाद स्टार्च प्रा.लि.फॅक्टरीचे चेअरमन अमोल श्रीपालशेठ व संचालक श्वेतांग शैलेशभाई (ईई-28,भाग्योदय सोसायटी, बेथाक, नरोडा, अहमदाबाद-गुजरात) व संचालक शशीन महेश मेहता (ए-8, सुरेशा अपार्टमेंट, ईशिता टॉवरच्यासमोर, नवरंगपुरा, अहमदाबाद-गुजरात) यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा
दाखल होता.