मक्का: मक्का येथे जगातील सर्वांत मोठी व पवित्र मानली जात असलेल्या ग्रँड मशीदीवरील दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा दलांनी उधळवून लावल्याची माहिती शुक्रवारी सौदी अरेबियाच्या अंतर्गत मंत्र्यांनी दिली. अल अरेबिया टीव्ही आणि सौदी सरकारची अधिकृत वाहिनी अल इखबारियाने दिलेल्या वृत्ताचा हवाला याबाबत हवाला दिला आहे. संशयित आत्महघातकी हल्लेखोराने बॉम्बस्फोटाने स्वत:ला उडवून लावले. यात एका सैनिकासह 9 जण ठार झाल्याचे वृत्तत म्हटले आहे.
तीन दहशतवादी संघटनांची योजना
तीन दहशतवादी संघटनांनी एकत्रित येऊन हा कट रचल्याचे सौदी सरकारने सांगितले. यातील दोन दहशतवादी संघटना या मक्केतीलच आहेत. तर तिसरी संघटना ही जेद्दा येथील आहे. सौदीतील सुरक्षा दलांनी मक्कामधील असिला जिल्हा आणि अजयाद-अल-मसाफी या भागात दहशतवादविरोधात कारवाई केली. अजयाद येथील एका घरात आत्मघातकी हल्लेखोर लपले होते. त्यांनी शरण येण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्या दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवून दिले. या घटनेत 6 नागरिक आणि 5 सैनिक जखमी झाले. या प्रकरणी एका महिलेसहीत 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या ऑपरेशनचे अनेक दृष्ये लोकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. यातील अनेक छायाचित्रे हे स्फोटानंतरची आहेत. यापूर्वी शुक्रवारी सकाळी सुरक्षादलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. या संशयित दहशतवाद्याच्या अनेक साथीदारांना मक्कातील एका भागातून अटक करण्यात आली आहे.