मक्याच्या शेताला आग; 60 हजारांचे नुकसान

0

रावेर। तालुक्यातील सांगवे शिवारातील मक्याच्या शेताला शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतकर्याचे सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. रावेर येथील पुनमचंद ओेंकार चौधरी यांची तालुक्यातील सांगवे शिवारातील सात एकर शेती क्षेत्रात मकाचे कापणी योग्य पीक होते.

गुरुवार 27 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने मक्याच्या शेताला आग लागून दिड एकर क्षेत्रातील मका जळून खाक झाला. रावेर नगरपालिकेचे अग्निशमन बंब व विटवा येथील शेतकर्‍यांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. या आगीत शेतकर्‍यांचे सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. विटवा येथील शेतकर्यांनी ही आग विझविण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न केल्याने आगीवर नियंत्रण मिळाले. त्यामुळे आग इतर शेतात पसरली नाही. म्हणून मोठा अनर्थ टळला. या नुकसानग्रस्त शेतकर्याला शासनाकडून भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.