मक्सरीस विरोध ; बिलवाडीच्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू

0

जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू ; एमआयडीसी पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल, संशयित ताब्यात

जळगाव– मस्करी का घेतली, असे विचारल्याचा राग आल्याने तरुणाने केलेल्या बेदम मारहाणीत प्रभाकर माणिक गायकवाड वय 35 रा. बिलवाडी ता.जळगाव याचा मृत्यू झाल्याची गुरुवारी समोर आली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने 8 रोजी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बुधवारी रात्री 11.30 वाजता मृत्यू झाला होता. याप्रकरणी शवविच्छेनाच्या अहवालावरुन गुरुवारी एमआयडीसी पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित दिनेश भिवा भिल रा.बिलवाडी ता.जळगाव याला पेालिसांनी ताब्यात घेतले आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रभाकर माणिक गायकवाड हे पत्नी रुख्मीणी, तीन मुली लक्ष्मी, पौर्णिमा, खुशी अशासह बिलवाडी येथे वास्तव्यास होता. हातमजुरी करुन त्याचा उदरनिर्वाह भागत होता. गावात दिनेश भिवा भिल्ल हा राहतो. दिनेशही हातमजुरी करत असल्याने त्याच्यासोबत प्रभाकरची ओळखी होती.

मस्करी घेणे पडले महागात
गावातील चौकात 6 रोजी प्रभाकर हा चौकात बसलेला होता. याचवेळी दिनेश भिलही त्याठिकाणी आला. व प्रभाकरची मजाक घेवू लागला. मजाक घेवू नको असे बोलल्याचा राग आल्याने दिनेशने प्रभाकरला शिवीगाळ करुन, पोटावर, पाठीवर व छातीवर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीदरम्यान याच चौकात बसलेल्या अशोक काशिनाथ सोनवणे, पांडुरंग दयाराम पाटील यांनी प्रभाक रची सुटका केली.

मृत्यूपूर्वी पोलिसांनी नोंदविला होता जबाब
मार लागल्याने पोटाला हात लावतच प्रभाकर घरी आला. पत्नी रुख्मीणीने गावातील डॉ.भरत पाटील यांना बोलावून त्यांच्याकडून तपासणी केली. यानंतर दुसर्‍या दिवशी प्रभाकरला जास्तच त्रास होत असल्याने आई शांताबाई हिने म्हसावद येथील डॉ. पटेल यांच्या रुग्णालयात तपासणी केली, त्यांनी जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 8 रोजी जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. माहिती मिळाल्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे बाळू पाटील यांनी प्रभाकरचा जबाब नोंदविला होता. त्यानुसार पोलिसात नोंद केली होती.

संशयिताला अटक
उपचारादरम्यान 9 रोजी रात्री 11.30 वाजता प्रभाकरचा मृत्यू झाला. मारहाणीत पोटात जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदनाच्या अहवाल गुरुवारी पोलिसांना प्राप्त झाला. त्यानुसार प्रभाकरच्या मृत्यूप्रकरणी त्याची पत्नी रुख्मीणी हिच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताचा पोलीस उपनिरिक्षक योगेश शिंदे यांच्यासह बाळू पाटील, शशी पाटील, संदीप पाटील यांनी बिलवाडी येथून संशयित दिनेश भिवा भिल्ल यास ताब्यात घेतले. दरम्यान मजाक घेणे दिनेशला चांगलेच महागात पडले आहे. उशीरापर्यंत आपल्याला खूनाच्या गुन्ह्यात अटक केल्याबाबतही दिनेशला माहित नव्हते.