‘रेझिंग डे’ निमित्त सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन
हडपसर : दरवर्षी जानेवारी महिन्यात साजरा होणार्या रेझिंग डे च्या अनुषंगाने हडपसर येथील मगरपट्टा सिटीतील आयटी पार्कमध्ये काम करणार्या अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी पुणे पोलीस आयुक्तांसोबत सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आयटी कंपन्यांचे 1500 ते 2000 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुणे पोलीस आयुक्तालय तसेच राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये सेवा, क्रिप्स, पोलीस बडी कॉप, भरोसा सेल, पोलीस काका, ट्रॅफिक मॅनेजमेंट या विषयावर सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाप्रसंगी सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडके, अप्पर पोलीस आयुक्तसुनील फुलारी, सतीश मगर, ज्योतिप्रिया सिंग, तेजस्वी सातपुते, प्रकाश गायकवाड, सुनील देशमुख, मिलिंद पाटील, सुनील तांबे आदी उपस्थित होते.
लवकरच हिंमत अॅप
के. व्यंकटेशन यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या विविध योजनांमुळे शहरातील गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे सुनील फुलारी व प्रकाश गायकवाड यांनी शांगितले. महिला, बालक तसेच जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून भरोसा असेल हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी नागपूर येथे सर्व सामान्यांच्या सुरक्षेसाठी रक्षा अॅप सुरू केले होते . याच धर्तीवर पुणे शहरात हिंमत अॅप लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.