पिंपरी । महाराष्ट्र मजदूर संघटना आणि महापालिकेच्या वतीने माथाडी कायद्याचे जनक कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंचवड येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेवक तुषार हिंगे, केशव घोळवे, परेश मोरे, प्रवीण जाधव, पोपटराव धोंडे, बाळासाहेब देसाई, अंकुश लांडे, मुरली कदम, खंडू गवळी, पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे, राजू तापकीर, सतीश कंठाळे, हनुमंत तरडे उपस्थित होते.