भिवंडी : गायत्री नगर येथे शरीफ शेख महम्मद अन्सारी यांच्या बहुमजली इमारत बांधण्याचे काम सुरू होते. तेथे मतीलाल प्रजापती (55) हा मजुर काम करीत होता. 5 व्या मजल्यावर काम करीत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्यात गंभीर जखमी झाल्याने जागीच मयत झाला. पोलिसांनी या प्रकरणी विकासक अन्सारी यांने मजुराच्या संरक्षणाची कोणतीही काळजी न घेता हायगय दाखविल्याने त्याचा मृत्यू झाला या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आलेेला आहे.