मजुराच्या घरातून सव्वातीन लाखांचे दागिने लांबवले : एरंडोलमधील प्रकार

Daring house burglary in Erandole City : Thieves Made Off With Cash And Cash एरंडोल : कुडाच्या घरात घर मालक नसल्याची संधी चोरट्यांनी साधत रोकडसह सुमारे सव्वा तीन लाखांच्या दागिण्यांवर डल्ला मारण्यात आल्याची घटना शहरातील शासकीय रेस्टहाऊस जवळ घडली. या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
शहरातील शासकीय रेस्ट हाऊस जवळ कुडाच्या घरात मजूरी प्रताप मदन बारेला (40, कळबाजीरा, ता.सेंधवा, ह.मु.एरंडोल) हे कुटूंबासह वास्तव्यास असून मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवार, 24 नोव्हेंबर रोजी बारेला हे कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुडाचे घर तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन लाख 34 हजार 600 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच 90 हजारांची रोकड मिळून तीन लाख 24 हजार 600 रुपयांचा ऐवज लांबवला. बारेला घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास सहा.निरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.