जळगाव। वडगाव येथे आलेला मुजूर शेतांकडे हिंडण्यास गेला असता शुक्रवारी सकाळी पाय घसरून विहिरीत पडला. दुसर्या दिवशी आज सकाळी गुरे चारणार्या तरुणांनी मुजूरला बाहेर काढले. मात्र, शुक्रवारी कुणीच मदतीला आले नसल्याने त्याला विहिरीतच रात्र काढावी लागल्याच प्रकार उघडकीस आला. अशोक सुपडु दामोधर (वय-50, रा.शेरी ता. जामनेर) हा हातमजुर शुक्रावार रोजी कामासाठी बाहेर पडला. त्याच्या गावापासून 15 कि.मी.दुर असलेल्या वडगावला तो पोहचला. वाटेत एका शेतात विहिर दिसल्याने तो विहीरीवर पाणी पिण्यासाठी थांबला. मात्र, आहे की नाही बघण्यासाठी अशोक हे डोकावले असता पाय घसरून विहीरीत पडले.
विहीरीमध्ये 3 फुट पाणी होते. विहीरीत पडल्या नंतर त्यांनी आराडाओरड केला परंतु कोणीही जवळपास नव्हते. त्याला पोहता येत नव्हते परंतु विहीरीत मोटर सोडण्याची दोरी होती. ती दोरी पकडून अशोक दामोधर विहीरीत उभे राहिले. शनीवार रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास काही गुराखी गुरे चारण्यासाठी तिकडे घेवून आले. त्यांची चाहूल लागताच दामोधर यांनी मदतीसाठी आवाज देण्यास सुरवात केली. त्यांचा आवाज ऐकून गुराखी व काही शेतकर्यांनी अशोक यांना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. दामोधर यांच्या उजव्या पायाच्या बोटाला व हाताला दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत.