Forced looting trio in MIDC police net जळगाव : मजुराला अडवून त्याला मारहाण करत त्याच्याकडील रोकड, मोबाईल लांबवण्यात आल्याची घटना शहरातील एमआयडीसीतील किरण पाईप या कंपनीजवळ घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुरूवार, 6 ऑक्टोबर रोजी त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत. योगेश विजय जाधव (23, खुपचंद साहित्या नगर, जळगाव), सुनील भागवत कोळी (30) आणि करण जसबीरसिंग संधू (22, सुप्रीम कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दुचाकी अडवत केली लूट
जळगाव तालुक्यातील खेडी येथे विनायक नगरात जितेंद्र भास्कर काळे (वय-36) हा तरूण सोमवार, 3 ऑक्टोंबर रोजी त्यांच्या दुचाकीने कामावरुन घराकडे परतत असतांना, एमआयडीसीतील किरण पाईप या कंपनीजवळ या तिघांनी जितेंद्र काळे यांची दुचाकी अडवली. त्याला मारहाण करत त्यांच्याजवळील पाच हजारांचा मोबाईल, तीन हजार रुपये रोख व दुचाकीची चाबी असा एकूणआठ हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून घेत तिघेही पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक
गुन्ह्यातील तीनही संशयीत हे सुप्रिम कॉलनीतील जंगलात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना गुरूवारी मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, नाना तायडे, मुकेश पाटील, इमरान सय्यद, सुधीर साळवे, संदीप धनगर, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, होमगार्ड विजय कोळी यांनी कारवाई करतयोगेश विजय जाधव (23, खुपचंद साहित्या नगर, जळगाव), सुनील भागवत कोळी (30) आणि करण जसबीरसिंग संधू (22, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांना अटक केली.