जळगाव । मजुरीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने एकाने भास्कर मार्केट एकास चांगलेच बदडून काढले. यामूळे परिसरात गर्दी जमल्याने तणावाची परिस्थीती निर्माण झाली होती. ही घटना सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हाची नोंद करण्यात
आली आहे.
पाच दिवस केली होती मजुरी
धरणगाव येथील संजय सुकलाल महाजन यांचे रामलाल पाटील यांच्याकडे काम केले असता या कामाच्या मजुरीचे पैसे घेणे आहेत. यातच पाच दिवस मजुरी करुन ही पैसे देत नसल्याने रामलाल पाटील यांना भास्कर मार्केट जवळील गोदावरी हॉस्पीटल समोर संजय महाजन यांनी गाठले. यावेळी पाच दिवसाची मजुरी महाजन यांनी पाटील यांना मागितली. मजुरीच्या कारणावरुन दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारी झाले. यात दोघांना किरकोळ जखमाई झाल्या आहेत. हाणामारी सुरु असल्याने भास्कर मार्केट परिसरात यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. जवळच असलेल्या जिल्हापेठ पोलीसांनी दोघांना पोलीस ठाण्यामध्ये चौकशी कामी ताब्यात घेतले. याप्रकरणी संजय महाजन यांच्या फिर्यादीवरुन रामलाल पाटील यांच्याविरुध्द गुन्हाचे नोंद करण्यात आली आहे. तपास पुरुषोत्तम
वाघले करीत आहेत.