वाकड : इमारतीला रंगकाम करताना पडल्याने रंगकाम करणार्या मजुराचा मृत्यू झाला. ही घटना 29 ऑगस्ट रोजी अॅव्हेन्यू बांधकाम साईट, वाकड येथे घडली. कंत्राटदाराने कामगारांची सुरक्षितता न बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल श्रावण कांबळे (वय 21, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंत्राटदार जितेंद्र ओमप्रकाश झंझोटर (वय 38, रा. देहुरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इकबाल शेख असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. कंत्राटदार जितेंद्र याची ऍव्हेन्यू बांधकाम साईट सुरू आहे. त्या साईटवर इकबाल हा इमारतीच्या दुसर्या मजल्याच्या गॅलरीला रंगकाम करत होता. काम करत असताना त्याचा तोल गेला. तो 25 फूट उंचीवरुन खाली पडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. कंत्राटदाराने कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या अपघातात कामगाराचा मृत्यू झाला. यावरून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.