चाळीसगाव । कामावरुन परतुन गावाकडे जाण्यासाठी वाहन शोधण्यासाठी तालुक्यातील रांजणगाव फाट्याकडे पायी येत असतांना मागवुन भरधाव वेगाने येणार्या ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होवुन मुरुमाखाली दाबला जावुन 19 वर्षीय तरुणाचा 14 मे 2017 रोजी सायंकाळी 5-30 ते 5-45 वाजे दरम्यान तालुक्यातील रांजणगाव फाट्याजवळ ढेप कारखान्याजवळील रोडवर मृत्यू झाला आहे.
घरी जात असताना मुरूम भरलेल्या ट्रॅक्टरची धडक
जेसीबीवर मदतनीस म्हणुन काम करणारा दिपक राजेंद्र पाटील (वय-19, रा. भामरे बु॥) हा तरूण काम संपल्यावर घराकडे जाण्यासाठी वाहन शोधण्यासाठी रांजणगाव कडुन रांजणगाव फाट्याकडे पायी येत असतांना 14 रोज सायंकाळी 5-30 वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्याजवळ ढेप कारखान्याजवळ रोडवर रांजणगाव कडुन मुरुम भरुन रांजणगाव फाट्याकडे येणार्या ट्रॅक्टर ने त्यास धडक दिल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली (एमएच 19 क्यु 4026) पलटी होवुन मुरुमाखाली दबुन दिपक राजेंद्र पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टर चालक कृष्णा राठोड रा.बोढरे ता. चाळीसगाव हा तेथे न थांबता व पोलीसांना खबर न देता फरार झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अनिल आधर पाटील (रा.भामरे) यांच्या फिर्यादीवरुन आरोपी कृष्णा राठोड याचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार जगदीश चौधरी करीत आहेत.