मठात घुसून महाराजांसह दोघांची निर्घृण हत्या

0

नांदेड – मुंबई जवळील पालघर येथील दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये एका साधूचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री दीड वाजताच्या सुमारास खून झाला आहे. या घटनेने भाविकात एकच खळबळ उडाली आहे.

गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि त्यानंतर गळा दाबून खून केला. महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असतानाच शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली.
नागठाणा येथील ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्याच मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला असून मयताचे नाव भगवान शिंदे रा. चिंचाळा ता. उमरी असे असल्याचे समजते.