‘मणिकर्णिका’साठी कंगनाने घेतला एक निर्णय

0

मुंबई : बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका – द क्विन ऑफ झांशी’ या चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा आहे. अनेक वादविवादानंतर अखेर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र, या चित्रपटाबद्दल कंगनाने आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या जागी कंगनाचे नाव घेण्यात येत होते. दिग्दर्शक क्रिशने हा चित्रपट मध्येच सोडून दुसरा प्रोजेक्ट हाती घेतल्याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा कंगना सांभाळत होती. मात्र, आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या नावावर क्रिशचेच नाव देण्यात येणार, असे तिने एका माध्यमाला सांगितले आहे. दिग्दर्शकाचे श्रेय स्वत:च्या नावावर घेण्यास तिने नकार दिला आहे. क्रिश हेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, असा तिने स्पष्ट केले आहे.