इम्फाळ ।मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे एन. बिरेन सिंह विराजमान झाले आहेत. राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी त्यांना बुधवारी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 21 जागा मिळाल्या. मात्र अपक्ष तसेच लहान पक्षांच्या मदतीने भाजपने आपले सरकार बनविण्यात यश मिळवले.
भाजपने मणिपूरमध्ये पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली असून याची धुरा एन. बिरेन सिंग हे सांभाळणार आहेत. सिंग हे मूळचे काँग्रेसी होत. त्यांनी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्याविरोधात बंड करुन आपल्या विधासभा सदस्याचा राजिनामा दिला होता.