मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृतीचे आवाहन

0

रावेरला तहसीलदारांनी प्रमुख शासकीय अधिकार्‍यांची घेतली बैठक

रावेर- मतदार जागृती अभियान संदर्भात रावेर तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी रावेर तालुक्यातील सर्व शासकिय कार्यालयातीत प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपापल्या कार्यक्षेत्रात आणि आपल्या कार्यालयातील प्रमुख पाच ते सहा लोकांची कमिटी स्थापन करायचे व कमिटीला आपल्या परीसरातील कार्यालयातील मतदारांना मतदान जास्तीत-जास्त होण्यासाठी आणि मतदार गैरहजेरीचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच नवीन नाव मतदार यादीत नोंदणी किंवा कमी करण्यासाठी फॉर्म भरून येणे, मतदार यादीतील नोंदीचे आमंत्रण तसेच मतदार नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे या संदर्भात माहिती देण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रीय मतदारदिन साजरा करण्याच्या सूचना
तालुक्यातील सर्व संबंधित शासकीय कार्यालयातील प्रत्येकी एक अधिकारी तालुकास्तरावरील हे तहसीलदार कार्यालयाच्या समितीचे सदस्य राहणार असून तालुका समिती सर्व शासकीय कार्यालयातील समित्यांवर नियंत्रण ठेवणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बैठका घेऊन सर्वांना योग्य त्या सूचना करण्यात येणार असल्याचे तहसीलदार म्हणाले. येत्या 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात सूचना केल्या तसेच त्या दिवशी मतदार जागृती प्रतिज्ञा सुद्धा सर्व कार्यालयांमध्ये घेण्याच्या सूचना केल्या तसेच मतदार जागृती संदर्भातील पोस्टर्स भिंती चित्रे सर्वांना यावेळी देण्यात आली.

यांची होती बैठकीला उपस्थिती
यावेळी वनविभागाचे वन क्षेत्रपाल आर.जी.राणे, जिल्हा परीषद जलसिंचनचे आर.एन.जाधव, पंचायत समिती विस्तार अधिकारी सी.आर.महाल, डी.एचसोनवणे, जिल्हा परीषद बांधकाम अभियंता सी.आर.चोपडेकर, वाघ, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी एम.एस.शिंदे, व्ही.बी.पाटील, सावद्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, रावेरचे राजेंद्र करोडपती, नगरपालिका प्रतिनिधी पांडूरंग महाजन, श्रीराम फाऊंडेशनचे सचिव दीपक नगरे, कृषी विभागाचे व्ही.एच.महाजन, भूमी अभिलेख अधीक्षक के.पी.देवरे आदी उपस्थित होते.