अमेठी: आज देशात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. अमेठीत कॉंगेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात मुख्य लढत आहे. सकाळपासून मतदान होत आहे. दरम्यान स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर पुन्हा टीका केली आहे. आज मतदान होत आहे, तरी देखील राहुल गांधी अमेठीत आले नाही. राहुल गांधी यांच्याकडून मतदानाच्या शेवटच्या दिवशीही मतदारांचा अपमान झालेला आहे अशी टीका स्मृती इराणी यांनी केली आहे.
राहुल गांधी इतके घमंडी असतील हे मला माहित नव्हते, किमान आज तरी त्यांनी मतदारांशी संवाद साधला पाहिजे होता अशी टीका इराणी यांनी केली आहे.