जळगाव । राज्यभरात मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितिच्या निवडणुकांसाठी आज मतदान करण्यात आले. गुरुवारी 16 फेबुवारी रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान झाले. जिल्ह्यातील एकुण मतदान ….. टक्के झाले. जिल्ह्यात सर्वच ज्येष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकांच्या निमित्ताने पणाला लागल्यानंतर आपलीच निवड होणार असल्याचा दावा उमेदवारांकडून होत आहे. जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षाची कसोटी पणाला लागली आहे. जिल्ह्यातील 67 जिल्हा परिषद गटासाठी 256 उमेदवार तर 134 पंचायत समिती गणासाठी 520 उमेदवार रिंगणात आपले नशीब आज झालेल्या मतदान पेटीत बंद झाले असून आता उत्सुकता निकालाची लागली आहे. दरम्यान प्रशासनाची निवडणुकीसंबंधी सर्व तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. सकाळी 8 वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्यासाठी सुरूवात केली होती. सकाळी मतदानाला संथ गतीनं सुरुवात झाली असली तरी 11 नंतर मतदानाचा वेगवाढून सायंकाळी मतदान केंद्रात तुंबळ गर्दी जमली होती. यात काही ठिकाणी मतदारांना टोकन देवून सायंकाळी 5.30 वाजेनंतर मतदान करण्यात आले.
तालुकानिहाय टक्केवारी
चोपडा 63.14, यावल – 60, रावेर – 66.79, मुक्ताईनगर 64.1, बोदवड – 64.56, भुसावळ – 50.89, जळगाव – 67.4, धरणगाव – 65.59, अमळनेर – 59.06, पारोळा – 64.41, एरंडोल – 2.74, जामनेर – 64.99, पाचोरा – 62, भडगाव – 61.69, चाळीसगाव – 61.61 असे मतदान करण्यात आले असून एकुण जिल्ह्यात 62.79 टक्के मतदान करण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यात 61.61 टक्के मतदान
चाळीसगाव । तालुक्यातील 7 जि.प. गट व 14 पंचायत समितीच्या गणासाठी आज किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी असली तरी दुपारी 3 वाजेनंतर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. 2 लाख 46 हजार 247 पैकी 1 लाख 51 हजार 749 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून एकुण मतदान 61.61 टक्के झाले आहे. देवळी-तळेगाव गटात बोहल्यावर चढण्या अगोदर अंधारी येथील गणेश रामकिसन नागरे या नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी तालुकाभरात मतदानाला संथगतीने सुरूवात झाली. सकाळी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने दुपार पर्यंन्त किरकोळ मतदान वगळता संथ गतीने मतदानाला सुरूवात झाली. दुपारी 3 वाजेनंतर मतदारांचा मतदानासाठी कौल वाढल्याने काही मतदान वेैंद्रावर गर्दी दिसून आली.
दुपारनंतर मतदारांचा उत्साह काही मतदान केंद्रांवर याद्यांमध्ये घोळ असल्याने व मतदान कार्डाच्या लिंकवरून तपासणी होत असल्याने काही मतदारांना समस्यांना समोरे जावे लागले. त्यांची नावे शोधण्यासाठी बराच वेळ मतदारांना ताटकळत उभे रहावे लागले तर काही मतदारांना माघारी जावे लागले आहे. सायंकाळी मतदानाची वेळ संपण्याअगोदर जे मतदार मतदान केंद्रांमध्ये होते. त्या मतदारांना वेळेनंतर देखील मतदानाचा हक्क बजावता आला. दुपा मतदान प्रक्रिये दरम्यान पोलीस प्रशासनाच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता व मतदान करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने बोगस मतदानाचे प्रकार फारसे घडले नसल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त मतदान प्रक्रियेसाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून डीवायएसपी अरविंद पाटील, यांचे सह शहर पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, यांचे सह 14 अधिकारी, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे 50 कर्मचारी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे 50 कर्मचारी, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे 20 कर्मचारी, धुळे येथील 100 प्रशिक्षणार्थी पोलीस, जळगाव आरसीपी प्लाटूनचे 20 कर्मचारी, तर एसआरपी प्लाटूनचे 30 कर्मचारी आणि 95 होमगार्ड बंदोबस्तास असल्याची माहिती गोपनीय शाखेचे मधुकर पाटील व गणेश पाटील यांनी दिली आहे.
भुसावळ तालुक्यात किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान
भुसावळ । तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट व पंचायत समितीच्या सहा गणांच्या निवडणूकीसाठी गुरुवार 16 रोजी मतदान केंद्रांवर किरकोळ वाद वगळता मतप्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वत्र मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला. मात्र चार वाजेपासून नागरिक घराबाहेर पडल्यामुळे केंद्रांवर रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 42.26 टक्के मतदान झाले होते. तालुक्यातील कुर्हे पानाचे येथे भाजपाच्या उमेदवार पल्लवी सावकारे या मतदान केंद्रावर भेट देऊन परतत असतांना विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप केल्याची शंका आल्याने त्यांनी वाहनाजवळ येऊन झडती घेण्याचा प्रयत्न केला असता यावेळी दोन्ही गट समोरा- समोर येऊन शाब्दिक चकमक उडाली. यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच कुर्हे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांनी भेट देऊन पाहणी केली. व अतिरीक्त बंदोबस्त मागवून कर्मचार्यांना सर्तकतेच्या सुचना केल्या.
कुर्र्हा पानाचे येथे दोन्ही गटाचे कार्यकर्ते नियंत्रण रेषेच्या आत आले असता त्यांना बाहेर काढल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडलेली नसून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
– डिवायएसपी निलोत्पल
मी व माझी दिराणी गाडीत बसलेले होतो मात्र आम्हाला कुणीही गावातील नागरिकांनी धक्का बुक्की केली नाही. तसेच कुणीही काही बोलले नाही. गावातील काही मुलांना भुसावळच्या काही गुंडांनी त्यांना भडकविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गावकर्यांनी त्यांना आवर घालून वातावरण शांत केले. व सुरळीतपणे आम्हाला गावातून बाहेर जावू दिले. त्यामुळे निवडणूक शांततेत पार पडली. – पल्लवी सावकारे, भाजपा उमेदवार
जामनेर – तालुक्यातील शेंदुर्णी-नाचणखेडा जिल्हा परिषद गटातील मतदार संघात बारामतीनंतर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचा अखंडीत बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणार्या शेंदुर्णी येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावतांना जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड.
मुक्ताईनगर । तालुक्यातील कोथळी येथे आपला मतदानाचा हक्क बजावतांना माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे सोबत महानंदा दुध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे खेवलकर
वरखेडी येथे 62.5 टक्के मतदान
वरखेडी । येथील दोन मतदान केंद्रावरील मतदान केंद्र क्र 54/19 वरती एकूण 1118 मतदारां पैकी 694 मतदारांनी आपल्या मताचा हक्क बाजवला यात पुरुष 334 तर स्रिया 360 आहे मतदान 62 टक्के झाले तर मतदान केंद्र क्र 54/20 वरती एकूण 1165 पैकी 742 मतदारांनीआपल्या मताचा हक्क बाजवला यात पुरुष 382 तर स्रिया 360 मतदानाची टक्केवारी 63 टक्के आहे. विशिष म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने महिला मतदारांची संख्या आहे. भोकरी या गावातील तीन मतदान केंद्रावरती पुढील प्रमाणे मतदान झाले आहे मतदान केंद्र क्र. 54/21 वरती एकूण 762 मतदारांपैकी 375 मतदारांनी आपल्या मताचा हक्क बाजवला यात पुरुष 176 तर स्रिया 199आहे मतदान 49 टक्के झाले. मतदान केंद्र क्र. 54/22 वरती एकूण 784 मतदारांपैकी 342 मतदारांनी आपल्या मताचा हक्क बाजवला यात पुरुष 154 तर स्रिया 188 असे असून मतदान 43 टक्के झाले आहे. मतदान केंद्र क्र. 54/23 वरती एकूण 1341 मतदारांपैकी 550 मतदारांनी आपल्या मताचा हक्क बाजवला. यात पुरुष 244 तर स्रिया 306 असून मतदान 41टक्के झाले आहे. भोकरी या गावी पुरुषा पेक्षा जास्त स्रिया मतदारांनी हक्क बजवला आहे. सुरवातीला दोनीही गावात मतदान केद्रा वरती धीमा पद्धतीने मतदान झाले. पंरतू दुपारी 2 वाजेनंतर मतदान केंद्रांवरती मतदारांच्या रांगा लागल्या. यात 5:30 वाजेपर्यंतजे मतदार मतदान केंद्राच्या आवारात होते. त्यांना टोकन देऊन 6:30 वाजेपर्यत मतदानाची प्रक्रिया झाली. दोन्ही ठिकाणे मतदान शांतेत व सुव्यवस्था पार पडले.
जामनेर तालुक्यात मतदारांमध्ये निरूत्साह
जामनेर । जळगाव जिल्हा परिषदेच्या 7 जागांसाठी व पं.स.च्या 14 जागांसाठी आज जामनेर तालुक्यात झालेले मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्याचे एकुण मतदान 64.99 काही ठिकाणी सकाळच्या वेळेत मतदारांमध्ये निरुडस्ताह दिसून आला. तर दुपारच्या वेळेस काहीशाप्रमाणात मतदार रांगामध्ये दिसून आले. दुपारच्या वेळेस साडे तीन वाजेपर्यंत 46 टक्क्यापर्यंत मतदान झाले होते. तर सायंकाळी पाळधी येथे उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया चालू होती. जामनेर तालुक्यातील रातणी येथे नगरवेदव मंगेश विकास शिरकरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदार याद्यांमध्ये बर्याचश्या तांत्रिक चुकांमुळे रातणी येथील काहीना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागले. येत्या 23 तारखेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून संपूर्ण तयारी केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
पाचोर्यात किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान
पाचोरा । पाचोरा तालुक्यात 5 जि.प.गट व 10 पं.स.गणासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 1 लाख 71 हजार 952 एकूण मतदानापैकी 90 हजार 615 पुरूष तर 81 हजार 335 असे मतदार होते. 62 टक्के मतदान झाले. अनेक गावात दुपारपर्यंत मतदारांनी मतदान करण्यास उत्सुकता दाखविली नाही. दुपारी 3 वाजेनंतर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 9.30 वा. 8.30 टक्के, 11.30 वा 22 टक्के, 1.30 वा. 38 टक्के, दुपारी 3.30 वा. 49 टक्के तर अनेक ठिकाणी उशिरापर्यंत रांगा लागल्या असल्याने सरासरी 62 टक्के मतदान झाले. कुर्हाड खु. येथे भाजपाच्या उमेदवाराचे पती संजय पाटील हे वारंवार मतदान केंद्रात जात असल्याचा मुद्या उपस्थित करून सेनेचे अरूण पाटील यांच्या शाब्दीक चकमक उडाली. संवेदनशिल नगरदेवळा, तारखेडा व बांबरुड या मतदान केंद्रावरही मतदान शांततेत झाले.
दुपारनंतर मतदानासाठी लागल्या रांगा
मतदान प्रक्रियेत बाळद-नगरदेवळा गटातील नेरी येथील मतदान केंद्रातील मतदान मशिनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने प्रक्रिया सुरू होण्यापुर्वीचे मशिन बदलविण्यात झाले. मात्र कोठेही अनुचित प्रकार पडला नाही. या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनिषा खत्री, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी, यांनी तर प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड व पोलि निरीक्षक नवलनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 278 कर्मचार्यांनी काम पाहिले. तसेच नाशिक सदराचे 50 पोलिस कर्मचारी, मुंबई येथील नव प्रशिक्षणार्थी 50 शिपाई, पाचोरा पोलिस स्टेशनचे 55, पिंपळगाव (हरे.) पोलिस स्टेशनचे 22 व 75 होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.