मतदानापूर्वी व्हायरल व्हिडीयोमुळे शिवराज सिंह चौहान अडचणीत

0

भोपाळ-मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहे. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांकडून आरोप करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. सोशल मीडिया युद्ध दोन्ही पक्षात रंगला आहे. यात कॉंग्रेसने थेट मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाच लक्ष केले आहे.

मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असतांना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या संपत्तीविषयी एक व्हिडीयो व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी शिवराज सिंह चौहान यांच्याकडे फक्त पाच एकर जमीन होती. आज ते कोट्यावधींचे मालक आहे. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे.

विदिशामधील वैस, शेरपुर आणि ढोलखेडी येथे असलेल्या कोट्यावधींची किंमत असलेले फार्म हाउस व्हिडीयोमध्ये दाखविण्यात आले आहे. व्हिडियोत १३ वर्षापूर्वी बुधनी या छोट्याश्या गावातील शेतकरी कुटुंबातील व्यक्ती १३ वर्षानंतर कशा प्रकारे इतक्या संपत्तीचा मालक होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

या व्हिडियोत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नी आणि मुलाच्या नवे असलेल्या कोत्यावाधींच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आलेला आहे.