मतदानासाठी जात असलेल्या दाम्पत्याचा अपघात

0

जळगाव । चोपड्याला मतदानासाठी जात असलेल्या हरिविठ्ठल येथील दाम्पत्याच्या दुचाकीचा खोटेनगर येथील साईपॅलेस जवळ सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास अपघात झाला. मागून येणार्‍या ट्रकने कट मारल्याने दुचाकी साईड पट्ट्ीवरून घसरून हा अपघात झाला. यात दोन्ही पती-पत्नी जखमी झाले आहेत. दोघांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असून महिलेच्या उजव्या पायाला गंभीर इजा झाली आहे.
मतदानासाठी कापुरे दाम्पत्य जात होते चोपड्याला
शरद इधन कापुरे (वय-30) हे कुटूंबियांसोबत हरिविठ्ठल येथे कुटूंबियांसोबत राहतात. आज गुरूवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होते. त्यामुळे सकाळी असल्याने शरद कापुरे व त्यांच्या पत्नी अनिता हे दोघे दुचाकी क्रं. एमएच.19.सीएल. 1738 ने चोपडा येथे जाण्यासाठी घरून निघाले. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास खोटेनगर जवळील हॉटेल साईपॅलेस समोरून जात असतांना मागुन येणार्‍या ट्रक (क्रं.पी.बी. 4613) त्यांना ओव्हरटेक करतांना कट मारला. ट्रकचा कट लागताच दुचाकी खोल साईड पट्टीवरून घसरली आणि रस्त्यावर आदळली. यात शदर कापूरे यांना मुकामार बसला परंतू त्यांच्या पत्नी अनिता यांच्या उजव्या पायाला गंभीर इजा होवून त्या रक्तबंबाळ झाल्या. शरद यांनी महामार्गावरून ये-जा करणार्‍या रिक्षाला थांबवून अनिता यांना त्यात बसवून जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ नेले. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कुरकुरे यांनी महिलेच्या पायावर उपचार केले. यावेळी महिलेच्या कुटूंबियांनी देखील रूग्णालयात गर्दी केली होती. शरद कापूरे यांनी ट्रक चालकाविरूध्द पोलीसात तक्रार दिली आहे. ट्रकने कट मारल्यानंतर खोल साईड पट्टीमुळे हा अपघात झाला. नेहमीच या साईड पट्ट्यांमुळे अपघात होवून काहींना आपले जीव गमवावे लागले आहे. तरी देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.