मतदान ओळखपत्रांचे वाटप

0

निगडी : जागतिक मतदार दिनाचे औचित्य साधून रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेत नवीन मतदारांना मतदान ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक कुंडलिक वराडी, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता कांबळे यांच्यासह नोडल आफिसर शिवशरण सालोटगी, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी सुनिता डाके, रेशमा पवार, कविता पगारे, निलिमा चाबुकस्वार, सचिन माळशिकारे, शाम तापकीर आदी उपस्थित होते.