मतदान करणार्‍यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये 50 टक्के सवलत

0

वासुदेव नेत्रालयाचे मतदार जनजागृती अभियान

भुसावळ- रावेर लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ.रेणुका पाटील आणि अ‍ॅड.डॉ.नितु पाटील यांनी मतदार जनजागृती अभियान रावबण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान करून आलेल्या मतदारांना आठवडाभर नेत्र तपासणीत 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. 23 एप्रिलला मतदान केल्यानंतर हे अभियान 23 ते 30 एप्रिल वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात चालणार आहे. मतदारांनी मतदान केल्यावर पुरावा म्हणून केवळ बोटावरील शाई दाखवल्यास या सवलतीचा फायदा घेता येणार आहे.लोकसभा निवडणुकीत मतदान केल्यावर मतदारांना याचा फायदा होणार आहे.

सशक्त लोकशाहीसाठी मतदान आवश्यक -डॉ.नितु पाटील
प्रत्येक नागरीकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य मंगळवार, 23 एप्रिल रोजी बजवावे. मतदाराला प्रोत्साहन मिळावे म्हणून 23 ते 30 एप्रिल या काळात मतदारांना नेत्र तपासणी शुल्कात 50 टक्के सूट मिळणार आहे. आपली सामाजिक बांधिलकी जोपासत सशक्त लोकशाहीसाठी मतदान करणे आवश्यक असल्याने नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ.नि.तु.पाटील यांनी केले आहे.